Top News

चंद्रपूरमध्ये चंदनाच्या एक हजार झाडांना आग #chandrapur #Fire #firenewsचंद्रपूर:- चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील मांगली देवतळे येथील एका शेतकऱ्याच्या शेतातील एक हजार चंदनाच्या झाडांना (sandalwood trees) आग लागली.

जयंत नौकरकार असं या शेतकऱ्याचं नाव आहे. त्यांनी दोन वर्ष आधी आपल्या शेतात चंदनाची एक हजार आणि इतर फळांची 600 झाडं लावली होती. मात्र दुपारच्या दरम्यान अचानक लागलेल्या आगीत ही सर्व झाडं आणि ठिबक सिंचन यंत्रणा जळून खाक झाली आहे. या आगीत शेतकऱ्याचं जवळपास 20 लाख रुपयांचं नुकसान झालं आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने