ब्रम्हपुरी बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेस पुरस्कृत पॅनेलचा डंका #chandrapur #bramhapuriब्रम्हपुरी:- ब्रम्हपुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल आज दि. 29 एप्रिल रोजी जाहीर झाला. यामध्ये काॅंग्रेस पुरस्कृत पॅनलचे 14 उमेदवार विजयी झाले आहेत तर भाजप प्रणित पॅनेलचे 4 उमेदवार विजयी झाले आहेत.

ब्रम्हपुरी कृषी उत्पन्न बाजार समितीवर मागील काही वर्षांपासून काॅंग्रेस पुरस्कृत पॅनलची सत्ता आहे. त्यामुळे यावर्षी देखील आपली सत्ता कायम राखणे हे काॅंग्रेससाठी प्रतिष्ठेचे होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत