मुल:- खासदार बाळू धानोरकर यांच्या कॉंग्रेसचा पराभव करीत, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकचे अध्यक्ष संतोष रावत यांचे कॉंग्रेसनी मूलच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत घवघवीत विजय मिळविला. दिनांक 29 एप्रिल रोजी संपन्न झालेल्या कृउबासच्या निवडणूकीचा निकाल आज तहसिल कार्यालयात जाहीर करण्यात आला. संतोष रावत यांनी मूल तालुक्यातील सहकार क्षेत्रातील आपला दबदबा कायम ठेवला.
संतोष रावत गटाला बाजार समितीची सत्ता मिळू नये यासाठी भारतीय जनता पार्टी आणि कॉंग्रेसचाच दुसरा बाळू धानोरकर यांचे नेतृत्वात माजी आमदार देवराव भांडेकर, माजी जि.प. अध्यक्ष प्रकाश मारकवार, माजी जि.प. उपाध्यक्ष विनोद अहिरकर यांनी तयार होवून त्यांनीही या निवडणूकीत रंग आणण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय जनता पार्टीने निवडणूकीचा नेमका निकाल काय लागणार हे माहीत असल्यांने, अखेरच्या क्षणी निवडणूकीतून माघार घेतली. त्यामुळे कॉंग्रेस विरूध्द कॉंग्रस लढत असतांना, भाजपाने बघ्याची भूमिका घेतली.