राजुऱ्यात ‘त्रिमूर्ती’ने केला शेतकरी संघटनेचा बालेकिल्ला उद्ध्वस्त! #Chandrapur #Rajuraराजुरा:- राजुरा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत काँग्रेस-भाजप युतीने दणदणीत विजय मिळवाल. आज (ता. २९ एप्रिल) रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पार पडलेल्या मतमोजणीत १८ पैकी १४ जागांवर काँग्रेस भाजप युतीने स्पष्ट बहुमत मिळवत शेतकरी संघटनेचा बालेकिल्ला उद्ध्वस्त केला.

 तब्बल वीस वर्षानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काँग्रेस-भाजप युतीला दणदणीत विजय मिळवता आला. एकूण १८ जागांपैकी काँग्रेस-भाजप युतीने १४ जागा प्राप्त केल्या. एक अपक्ष, तर शेतकरी संघटनेला केवळ तीन जागांवर समाधान मानावे लागले. पहिल्यांदाच आमदार सुभाष धोटे, माजी आमदार ॲड. संजय धोटे, माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी एकत्र येऊन शेतकरी संघटनेचा गेम केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत