काँग्रेसला चिमूर मध्ये धक्का तर भाजपची गाडी सुसाट... Chimur

Bhairav Diwase


चिमूर:- दि. २९ एप्रिल आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया आणि संजय डोंगरे यांच्या नेतृत्वात नुकत्याच पार पडलेल्या चिमूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत आज जाहीर झालेल्या निकालानुसार भाजपा समर्थित शेतकरी सहकार विकास पॅनलने मोठा विजय प्राप्त केला आहे. 18 जागांपैकी भाजपा समर्थित शेतकरी सहकार विकास पॅनलने 17 जागा जिंकल्या आहेत. तर काँग्रेस समर्थित महाविकास आघाडी परिवर्तन पॅनलने एका जागेवर विजय मिळवला आहे.