हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना पोंभुर्णा शहरात कार्यान्वित #chandrapur #pombhurna


पोंभुर्णा:- मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांनी प्रत्येक तालुक्यात एक या प्रमाणे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना केंद्र स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे.

त्या निर्देशाचा अनुषंगाने आरोग्य विभाग जिल्हा परिषद, चंद्रपुर व जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपुर यांचे संयुक्त विद्यामाने तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पोंभुर्णा परीसरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पोंभुर्णा येथे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना तालुका स्तरीय उद्घाटन दिनांक ०१ मे २०२३ रोजी सोमवारला सकाळी १०.०० वाजता ना. एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचा हस्ते ऑनलाईन प्रणालीद्वारे उद्घाटन करुन सुरु करण्यात येत आहे. करीता सदर कार्यक्रास समस्त जनतेने उपस्थीत राहावे ही विनंती

पोंभुर्णा येथील जनतेला गावातच आरोग्य सुविधा मिळावी या उद्देशाने सदर आपला दवाखाना सुरु करण्यात येत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रावर मिळणाऱ्या आरोग्य सेवांप्रमाणोच (काही सेवा वगळता) सुविधा देण्यात येतील जसे रोगनिदान व उपचार, गरोदर माता तपासणी, बालकांचे लसीकरण, 4 संशयीत क्षयरोग व कुष्ठरोग तपासणी, रक्त नमुणे घेणे. इत्यादी सेवा देण्यात येतील.

करीता पोंभुर्णावासीय जनतेनी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना यामध्ये येवुन आरोग्य सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. संदेश मामीडवार तालुका आरोग्य अधिकारी तथा वैद्यकिय अधिक्षक ग्रामीण रुग्णालय पोंभुर्णा यांचाकडुन करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या