Top News

भाविकांना महाकाली देवीच्या दर्शनाला घेऊन जाणारी बस उतरली रस्त्याखाली! #Chandrapur #bus



चंद्रपूर:- चंद्रपूरची आराध्य दैवत माता महाकालीच्या चैत्र शुद्ध षष्ठी दि.२७ एप्रिल पासून यात्रेला सुरूवात झाली आहे. चैत्र शुद्ध षष्ठी ते पौर्णिमा असा हे नवरात्र असतो.चंद्रपूरची आराध्य दैवत माता महाकाली देवीच्या दर्शनासाठी भाविकांना घेऊन जाणारी नांदेड एस टी महामंडळाची बस रस्त्याखाली उतरल्याची घटना आज सकाळी 10 वाजताच्या दरम्यान घुग्घूस-पडोली मार्गावर महाकुर्ला गावाजवळील अहमद लॉन वळण रस्त्यावर घडली.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ नांदेड डेपोची शिवशाही बस क्रमांक MH 13 CU 6909 हे वाहन भाविक भक्तांना घेऊन घुग्घूस मार्गे चंद्रपूर येथे महाकाली देवीच्या दर्शनासाठी येत असताना वाहन चालकाचे बसच्या स्टेरिंगवरून नियंत्रण सुटल्याने बस महाकुर्ला गावाजवळ असलेल्या अहमद लॉन जवळील वळणावर रस्त्याच्या खाली उतरली मात्र, सुदैवाने बस मधील प्रवाश्यांना हानी झाली नाही. चालक वाहकासह एस.टी.बस मधील भाविक सुरक्षित असल्याचे पडोली पोलीस स्टेशनचे ठाणेदार पवार यांनी सांगितले.

#theft #warora #chandrapur #gadchiroli #Maharashtra #India #Adharnewsnetwork #bhairavdiwase #police #yawatmal #nagpur #arrested #Gondwanauniversitygadchiroli #SardarPatelmahavidyalayachandrapur #spcollegechandrapur #tataIPLmatch #ipl #ilplive #GTVsCSK #accident 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने