छत्तीसगड:- छत्तीसगडच्या दंतेवाडामधून एक मोठी बातमी समोर आली आहे. दंतेवाडामध्ये नक्षली हल्ल्यात ११ जवान शहीद झाले आहेत. छत्तीसगडमध्ये गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकला होता. यावेळी नक्षलवाद्यांनी पोलिसांवर हल्ला केला. यात ११ जवान शहीद झाल्याची माहिती समोर येत आहे.
हेही वाचा:- नक्षली घटनेत शहीद झालेले जवान आणि खासगी चालकांची नावे
मिळालेली माहिती अशी, छत्तीसगड पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती. या ठिकाणी नक्षलवादी मोठ्या प्रमाणात होते. यात त्यांच्या काही कमांडरचे पतकही होते, अशी माहिती मिळाली होता. दरम्यान, या माहितीवर पोलीस तिथे गेले होते. यावेळी नक्षलवाद्यांनी आयईडीचा वापर करुन स्फोट घडवून आणला. यात घातक स्फोटकांचा वापर केला होता अशी माहिती समोर आली आहे. या स्फोटात ११ जवान शहीद झाले आहेत.
हेही वाचा:- छत्तीसगड हल्ल्यानंतर गडचिरोलीत 'हाय अलर्ट'
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत