कोंबड बाजारावर धाड; सहा जणांना अटक #chandrapur


चंद्रपूर:- शहरात सुरू असलेल्या कोंबड बाजारावर चंद्रपूर शहर पोलिसांनी धाड टाकून सहा जणांना अटक केली. या कारवाईत दोन कोंबडे, दोन कात्या, चार दुचाकीसह एक लाख ८५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई विठ्ठल मंदिर वॉर्डातील वैभल लक्ष्मी मंदिराजवळ सोमवारी करण्यात आली.

विशाल गोपीचंद दुर्गे (२८), यमाची कालिदास गेडाम (२८), अभिजित मारोतराव बेले (३३), मंगेश रमेश सोनटक्के (२६) विक्की मधुकर निमसरकार (३४), आशिष रमेश सोनटक्के सर्व रा. चंद्रपूर असे अटकेतील आरोपींचे नाव आहे. विठ्ठल मंदिर वॉर्डात कोंबड बाजार सुरू असल्याची माहिती शहर पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक मंगेश भोंगाडे यांना मिळाली. त्यांनी डीबी पथकासह घटनास्थळ गाठले. यावेळी कोंबड बाजारावर जुगार सुरू असल्याचे त्यांना दिसून आले. त्यांनी लगेच सहाही जणांना अटक करून घटनास्थळावरून दोन मृत कोंबडे, दोन लोखंडी कात्या, नगदी रोकड, चार दुचाकी असा एकूण एक लाख ८५ हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई पोलिस अधीक्षक रवींद्र सिंह परदेसी, अपर पोलिस अधीक्षक रिना जनबंधू, उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सतीश सिंह राजपुत, सहायक पोलिस निरीक्षक मंगेश भोंगाडे यांच्या नेतृत्वातील पथकाने केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत