भरधाव कार झाडाला आदळली; चालक गंभीर #chandrapur #gondpipari


गोंडपिपरी:- भरधाव वेगाने जाणारी कार झाडाला आदळल्याने चालक गंभीर जखमी झाला. ही घटना मंगळवारी दुपारी २ वाजता गोंडपिपरी-आक्सापूर मार्गावर वन तलावाजवळ घडली. सुशांत दिलीप गायकवाड (२७) असे जखमीचे नाव आहे.

(एमएच ३१ एएच ९४१८) क्रमांकाची कार गोंडपिपरीवरून चंद्रपूरकडे जात होत होती. दरम्यान, चालकाचे नियंत्रण सुटल्याने झाडाला धडक दिली. या धडकेत लातूर जिल्ह्यातील रहिवासी असलेला कारचालक सुशांत गायकवाड गंभीर जखमी झाला. ठाणेदार जीवन राजगुरू यांनी जखमी चालकाला गोंडपिपरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत