अंत्यसंस्कारासाठी जाणाऱ्या तरुणाचा ट्रॅक्टरखाली दबून मृत्यू #chandrapur #mul #accident


मुल:- अंत्यसंस्काराचे साहित्य ट्रॅक्टरने घेऊन जात असताना मध्ये आलेल्या दुचाकीमुळे झालेल्या अपघातात ट्रॅक्टरवर बसून असलेल्या तरुणाचा ट्रॅक्टरखाली दबून मृत्यू झाल्याची घटना मूल तालुक्यातील बेंबाळ येथे मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली.

नयन अनिल मारगोनवार (२०) असे मृत युवकाचे नाव आहे. यासंदर्भात ट्रॅक्टर चालकावर मूल पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

बेंबाळ येथे बोमनवार नामक महिलेचा मृत्यू झाला. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी चंदू मारगोनवार यांच्या मालकीच्या ट्रॅक्टर एमएच ३४ एपी ११०८ ने साहित्य नेल्या जात होते. दरम्यान, बेंबाळ-कोरंबी मार्गावर समोरून येणाऱ्या दुचाकी स्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात ट्रॅक्टर चालक चिंतामन लाडू राऊत याने ब्रेक दाबले. यामध्ये ट्रॅक्टरवर बसून असलेला नयन मारगोनवार उसळून खाली कोसळला.

दरम्यान, ट्रॅक्टरचे चाक त्याच्या अंगावरून गेल्याने तो गंभीर जखमी झाला. लगेच त्याला मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. मृतक हा मूल पंचायत समितीचे माजी सभापती चंदू मारगोनवार यांचा पुतण्या आहे. याबाबत पोलिसांनी ट्रॅक्टरचालक चिंतामन लाडू राऊत याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या