चंद्रपूर:- जिल्ह्यात सलग चार दिवसापासून वादळी पाऊस सुरू आहे. या पावसामुळे जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. या वादळी पावसाचा अंगावर शहारा आणणारा व्हिडिओ वायरल झाला आहे. वेकोली खाण परिसरात एका कर्मचाऱ्याच्या अंगावर थेट वीज कोसळली. ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. बाबु धनकुमार महेंद्र सिहं असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. आज वीज कोसळल्याने वेकोली कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.
वेकोलीच्या माजरी क्षेत्रातील नागलोन खाण परिसरात ओव्हर बर्डनची वाहतुक करणाऱ्या बाबु धनकुमार महेंद्र सिहं या कर्मचाऱ्याचा अंगावर वीज कोसळली. ही घटना ( मंगळवार ) दुपारी अडीच वाजताच्या सुमारास ओसी टु नागलोण खाण परिसरात घडली.
या घटनेची माहिती मिळताच माजरी पोलिसांनी घटनास्थळ गाठले. त्याच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती कळविण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.