कुलरमध्ये पाणी भरत असतांना करंट लागून महिलेचा मृत्यू #chandrapur #gadchiroli


गडचिरोली:- कुलरमध्ये पाणी भरत असतांना विद्युत करंट लागल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना जिल्हा मुख्यलयापासून काही अंतरावर असलेल्या गोगाव येथे 17 एप्रिल 2023 रोजी घडली. गोगाव येथील अश्विनी मुनघाटे हे सोमवार 17 एप्रिल रोजी कुलरमध्ये पाणी टाकत होती. दरम्यान तिला विद्युत करंट लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. सदर घटनेने परिसरात एकचं खळबळ उडाली आहे.

घटनेची माहिती तात्काळ गडचिरोली पोलिसांना देण्यात आली असता पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनाकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले. तिच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असून गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पुढील गडचिरोली पोलीस करत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत