Top News

कार्यानुभव विषयांतर्गत उपक्रमात सातवीच्या विद्यार्थ्यांचा सहभाग #chandrapur #pombhurna



पोंभुर्णा:- जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चेक आष्टा येथे इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी कार्यानुभव विषयांतर्गत विविध वस्तूंचा वापर करून सुंदर असे ग्रीटिंग कार्ड तयार केले. तसेच डाळ, गहू, तांदूळ यांचा वापर करून सुंदर असे कोलाज काम अंतर्गत छान चित्र तयार केले. या उपक्रमामध्ये इयत्ता सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांनी आंतरिक प्रेरणेने सहभाग नोंदविला. त्यामुळे त्यांना या कामाचा आनंद अनुभवता आला.


उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये अशाच प्रकारचे कार्यानुभव, कलाशिक्षण अंतर्गत विविध कलाकृती तयार करण्याचे विद्यार्थ्यांनी मनापासून ठरवलेले आहे. पुस्तके अभ्यासातून बाहेर पडून एक विरंगुळा म्हणून स्वतःतल्या अंगभूत गुणांना वाव देण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम नेहमीच शाळेत घेतल्या जातात, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.


विद्यार्थ्यांच्या कलागुलागुणांना अशा उपक्रमातून प्रोत्साहन दिले जाते आणि मुलांच्या भावनिक तथा सामाजिक गुणात्मक विकास होण्यास वातावरण निर्मिती केली जाते. मुलांच्या अंतरंगी असलेल्या विविध सुप्त गुणांना हेरून इतरही क्षेत्रात मुलांना करिअर करता येऊ शकतो, याची जाणीव मुलांना करून दिली जाते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने