Top News

सरदार पटेल महाविद्यालयाचे ५७ विद्यार्थी झळकले विद्यापीठस्तरीय गुणवत्ता यादीत #chandrapur #gadchiroli #Gondwanauniversitygadchiroli

चंद्रपूर:- चंद्रपूर येथील सरदार पटेल महाविद्यालयाने मोठ्या संख्येने विद्यार्थी विद्यापीठस्तरीय गुणवत्ता यादीत झळकण्याची परंपरा यंदाही कायम ठेवली आहे.

Notification Regarding Merit list for Academic Year 2021-22
https://unigug.ac.in/portal/administrator/administrator/images/news_attachment/04012023173128.pdf

गोंडवाना विद्यापीठाच्या घोषित करण्यात आलेल्या गुणवत्ता यादीत सरदार पटेल महाविद्यालयाचे ५७ विद्यार्थी यंदा गुणवत्ता यादीत झळकले आहेत.

गोंडवाना विद्यापीठाच्या नुकत्याच घोषित करण्यात आलेल्या २०२१-२२ च्या गुणवत्ता यादीत सरदार पटेल महाविद्यालयाने भरारी घेतली आहे. यंदा महाविद्यालयाचे मानव विज्ञान विद्या शाखेचे १२ , वाणिज्य व व्यवस्थापन शाखेचे १६, विज्ञान व तंत्रज्ञान शाखेचे २२ तर आंतर विद्या शाखा ७ असे एकूण ५७ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आलेले आहेत.

विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या घसघशीत यशात सर्वोदय शिक्षण मंडळाचे पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांचे सामुहिक प्रयत्न व विद्यार्थांच्या परिश्रमाचा महत्वाचा वाटा असल्याची प्रतिक्रिया महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.एम.काटकर यांनी दिली.

दरम्यान सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सुधाताई पोटदुखे, कार्याध्यक्ष अरविंद सावकार पोरेड्डीवार, उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, सचिव प्रशांत पोटदुखे, सहसचिव डॉ. किर्तीवर्धन दीक्षित, कोषाध्यक्ष मनोहर तारकुंडे, सगुणाताई तलांडी, राकेश पटेल, एस.के. रमजान यांनी महाविद्यालयाच्या यशाबद्दल प्राचार्य डॉ.पी.एम.काटकर, उपप्राचार्य डॉ. स्वप्निल माधमशेट्टीवार व त्यांच्या महाविद्यालयातील संपूर्ण चमूचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


आधार न्युज नेटवर्क व्हाट्सॲप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/GGicng7HUvdLEUNXtRUUvM

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने