व्हाईस ऑफ मिडिया डिजिटल विभागाच्या कोरपना तालुका अध्यक्षपदी मुबारक शेख यांची नियुक्ती #chandrapur #Korpana


कोरपना:- पत्रकारीतेसाठी स्थापन करण्यात आलेल्या व्हाईस ऑफ डिजीटल मिडीयाची चंद्रपूर जिल्हा कार्यकारीणी जाहिर करण्यात आली. त्यात कोरपना तालुका अध्यक्षपदी मुबारक शेख यांची निवड करण्यात आली आहे.


व्हाईस ऑफ मीडियाच्या डिजीटल विभाग चंद्रपूर जिल्हा सरचिटणीसपदी भैरव दिवसे यांची नियुक्ती

यात संपूर्ण जिल्ह्याची कार्यकारीणी घोषीत करण्यात आली आहे. व्हाईस ऑफ डिजीटल मिडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे राष्ट्रीय महासचिव दिव्या भोसले, व्हाईस ऑफ डिजीटल मिडिया विभागाचे प्रदेशाध्यक्ष जयपाल गायकवाड विभागीय अध्यक्ष मंगेश खाटीक, जिल्हाध्यक्ष संजय पडोळे यांचे अनुमतीने हि कार्यकारीणी डिजीटल विभागाचे जिल्हाध्यक्ष विजय सिद्धावार यांनी जाहिर केली आहे. जाहिर करण्यात आलेल्या कार्यकारणीत कोरपना तालुका अध्यक्षपदी मुबारक शेख यांची निवड करण्यात आली आहे.

गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली उन्हाळी परीक्षा 2023 वेळापत्रक पहा एका क्लिकवर...


मुबारक शेख हे आधार न्युज नेटवर्क चे कोरपना ग्रामीण प्रतिनिधी म्हणून काम करीत आहेत. नुकताच जानेवारी महिन्यात कै. कृष्णराव पाटील कोठावळे राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कारासाठी मुबारक शेख यांची निवड करण्यात आली होती. ५ जानेवारी रोजी नाशिक येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुबारक शेख यांच्या पत्रकारितेची दखल घेत त्याला व्हाईस ऑफ मिडिया डिजिटल विभागाच्या कोरपना तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडी बद्दल सर्वत्र त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत