अधिकाऱ्यांची आंदोलनकर्त्यासोबत चर्चा फिस्कटली #chandrapur #pombhurnaपोंभुर्णा:- पोंभूर्णा तालुक्यात ५० टक्के आदिवासी गावांमध्ये पेसा कायदा लागू करावा यासह विविध मागण्यांकरिता आंदोलन सुरू करण्यात आले आहे. दि. १९ एप्रिलला दुपारी शिष्टमंडळासोबत शासनाच्या प्रतिनिधींनी चर्चा केली. सायंकाळी ५ वाजता एक बैठक झाली. यावेळी अपर जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी, तहसीलदार उपस्थित होते; परंतु तोडगा न निघाल्याने चर्चा फिस्कटली. बुधवारी रात्री ९ वाजतापर्यंत आंदोलन सुरूच होते.

चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभूर्णा शहरात मंगळवारपासून (दि. १८) हजारो आदिवासी बांधव महिलांनी विविध मागण्यांकरीता आंदोलनाचा मार्ग स्विकारला आहे. त्यामध्ये ५० टक्के आदिवासी बहुल असलेल्या गावांमध्ये पेसा कायदा लागू करावा. ५० वर्षांपासून कसत असलेल्या वनजमिनी आदिवासींना देण्यात याव्या. सुरजागड येथील अवजड वाहतूक बंद करावी. इको सेन्सिटिव्ह झोन रद्द करण्यात यावा आणि वन्य प्राण्यांकडून झालेल्या नुकसानीचा तातडीने मोबदला वाढविण्यात यावा आदी मागण्यांचा समावेश आहे. अनेक वर्षांपासून या मागण्यांकडे राज्यसरकारचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे पोंभूर्णा तालुकासह जवळच्या परिसरातील आदिवासी बांधवांनी मागण्यांपूर्ण होत नसल्याने आंदोलनचा स्विकारला. हजारो आंदोलनकर्त्यांनी आंदोलनानंतर रास्ता रोको केले. दरम्यान बराचवेळ वाहतूक खोळंबलेली होती. या आंदोलनात पुरूषांसोबत अनेक महिलांचा सहभाग आहे.

आदिवासी बांधवांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आंदोलन पेटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका आदिवासी बांधवांनी घेतली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत