निरोप समारंभात अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे डोळे पाणावले #chandrapur #pombhurnaपोंभुर्णा:- दिनांक 24 एप्रिल 2023 रोज सोमवार ला चिंतामणी कॉलेज ऑफ सायन्स पोंभुर्णा येथे बी.एससी अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. हा समारंभ बी.एससी प्रथम आणि व्दितीय वर्षाच्य विद्यार्थ्यांनी आयोजित केला होता.

समारंभासाठी अध्यक्ष म्हणून डॉ. राजीव वेगिनवार प्राचार्य, चिंतामणी कॉलेज ऑफ सायन्स पोभुर्णा, प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. एन एच पठाण प्राचार्य, चिंतामणी महाविद्यालय पोंभुर्णा तसेच डॉ. ओम प्रकाश सोनोने, विद्यार्थी विकास अधिकारी चिंतामणी कॉलेज ऑफ कॉमर्स पोभुर्णा, प्रमुख मागदर्शक म्हणून डॉ. शीला नरवाडे, सिनेट सदस्य गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, डॉ. सुधिर हुंगे, सिनेट सदस्य गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली आणि डॉ अनंत देशपांडे, IQAC संचालक हे उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या अनुषंगाने वार्षिक बक्षीस वितरण तसेच विद्यापीठ परीक्षा मार्गदर्शनाचा कार्यक्रम सुद्धा आयोजित केला गेला होता. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी कॉलेज विषयीचा तीन वर्षाचा अनुभव सांगितला. डॉ. सोनोने यांनी विद्यापीठ परीक्षेवर व्याख्यान दिले. पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. उत्कृष्ट सहभागी विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र रोख रक्कम व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाची सांगता अध्यक्षीय भाषणाने झाली.

कार्यक्रमाचे संचालन कु. काजल मंकीवार बी.एससी प्रथम, प्रास्ताविक कू. अवंती मानकर बी. एससी द्वितीय आणि आभार कु. यास्मिन पठाण बी.एससी द्वितीय वर्ष हिने केले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी स्नेह भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. निरोप समारंभात अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे डोळे पाणावले होते. प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत