शेतात काम करताना वाघाने घातली झडप; महिला जागीच ठार #chandrapur #saoli #tiger


(आधार न्युज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) सौरभ चौधरी, सावली
सावली:- शेतात काम करत असतांना अचानक वाघाने हल्ला करुन महिलेस ठार केल्याची घटना सावली तालुक्यातील वाघोली बुटी येथे बुधवारी 5 वाजताच्या सुमारास घडली. ममता हरिचंद्र बोदलकर (70) रा. वाघोली बुटी असे मृतक महिलेचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, तालुक्यातील वाघोली बुटी येथील महिला ममता बोदलकर ह्या शेतात काम करण्यास गेल्या दरम्यान काम करत असतांना अचानक वाघाने त्यांच्यावर हल्ला करुन काही दूरवर फरफटत नेत ठार केल्याचे कळते. सदर घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

तालुक्यात वाघाच्या हल्ल्याच्या घटनेत वाढ होत असून वाघाचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी तालुक्यातील नागरिकांकडून होत आहे. सदर घटनेची माहिती वनविभाग व पोलीसांना देण्यात आल्याचे कळते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत