रक्ताने माखलेली पत्नी, वजनी दगड अन् विषाचा डबा #chandrapur #wardha #suicide #murder

Bhairav Diwase


वर्धा:- दोन दिवसांपासून आंजी येथील भावरकर यांच्या घरी किरायाने राहणाऱ्या कांबळे यांच्या घराचे दार उघडले नव्हते. कुंदन कांबळे, पत्नी शीतल,मुलगी मैत्री व मुलगा सम्राट असा चौघांचे कुटुंब आहे कुठे, अशी शंका शेजाऱ्यांना आली.

हेही वाचा:- इन्स्टाग्रामवरील मैत्रीतून शारीरिक अत्याचार

त्यांनी भाऊ संजय कांबळे यास माहिती दिली. घर ठोठावले पण प्रतिसाद मिळाला नाही. संजयने तडक पोलीस ठाणे गाठले.

पोलिसांनी भाऊ व अन्य लोकांच्या साक्षीने घराचे दार तोडून प्रवेश केल्यावर सर्वांना धक्का बसला. पती- पत्नी मृतावस्थेत आढळून आले. पत्नीच्या डोक्यावर गंभीर जखमा दिसून आल्या. बाजूला दगडही पडून होता. तसेच विषाचा डबाही होता. पत्नीस मारून पतीने आत्महत्या केल्याचे पोलिसांना प्रथमदर्शनी दिसून आले. दोन दिवस आधीच मुलांना मामाकडे पोहचवून देण्यात आल्याची माहिती पुढे आली. पती- पत्नी हे दोघेच घरी असल्याने विविध तर्कवितर्क व्यक्त होत आहेत. खारांगणा पोलीस ठाण्याचे ठाणेदार संतोष शेगावकर हे याप्रकरणी तपास करीत आहेत.