सरस्वती जिनींगमध्ये भीषण आग #chandrapur #Korpana #fire #firenews


शंभर क्विंटल कापूस जळून खाक


(आधार न्युज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) मुबारक शेख, कोरपना
कोरपना:- कोरपना-वणी राज्य महामार्गावरील कोरपना जवळील हेटी येथील जय सरस्वती जिनींग येथे शॉर्टसर्किटमुळे कापसाच्या गंजीला शुक्रवार २८ एप्रिल रोजी पहाटे पाच वाजताच्या सुमारास भीषण आग लागली.
प्राप्त माहितीनुसार, पहाटे अचानक शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत जवळपास शंभर क्विंटल कापूस जळून खाक झाला. त्याची अंदाजे किंमत सात लाख रुपये वर्तविण्यात येत आहे. आगीची घटना घडताच कोरपना नगर पंचायतचे अग्निशमन वाहन पाचारण करून आग नियंत्रणात आणली. घटनेचा पुढील तपास कोरपना पोलीस करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत