नागभीड:- तालुक्यातील मौजा खडकी येथील नववधू ही कथेच्या कार्यक्रमाकरिता माहेरी आली. कथा आटोपुन जेवनानंतर ती काका चे घरी आराम करण्यासाठी गेली असता कुलरच्या पाण्यात तिचा हात गेल्याने करंट लागला. त्यात तिचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दि. २६ एप्रिलला सायंकाळ च्या सुमारास घडली. तनु भाऊराव तोरे (२३) असे मृतक नववधूचे नाव आहे.
नागभीड तालुक्यातीठ मौजा खडकी (हुमा) येथी तनु भाऊराव तोरे हिचे वासाळा मेंढा येथील दुधराम पंचराम यांचेशी दि. २४ एप्रिल ला विवाह संपन्न झाला. वर व वधु दोघेही बुधवारी मांडव वाढणीच्या कार्यक्रमाकरिता वधुचे माहेरी खडकी येथे आले होते. मांडववाढणीचे कार्यक्रमानंतर जेवण झाल्यावर नववधु तनु भाउराव तोरे हि शेजारी असलेला शिवाजी तोरे या काकांचे घरी आराम करण्यास गेली असता कुलर च्या 'पाण्यात अलगद तिचा हात गेल्याने विद्युत शॉक लागून जागीच मृत्यू झाला. नववधु तनुच्या मृत्युने गावात शोककळा पसरली असुन सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत