ताडोबातील बिबट व अस्वलाचा छायाचित्र 'सोशल मीडिया'वर व्हायरल #Leopard #bear #tadobaandhari #tadoba #chandrapurचंद्रपूर:- ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात बिबट व अस्वल एकमेकांच्या समोर उभे ठाकले असल्याचे छायाचित्र समाज माध्यमावर चांगलेच व्हायरल झाले आहे.

पर्यटक सकाळ व दुपार अशा दोन्ही वेळात सफरीचा आनंद घेत आहेत. अशातच ताडोबा बफर झोनमध्ये येणाऱ्या कोलारा परिसरात बिबट आणि अस्वल एकमेकांच्या समोर उभे राहून एकमेकांकडे बघत असल्याचे छायाचित्र एका पर्यटकाने टिपले आहे. हे छायाचित्र समाज माध्यमावर सार्वत्रिक झाले आहे. विशेष म्हणजे या छायाचित्रात बिबट व अस्वल एकमेकांकडे मैत्री पूर्ण भावनेतून बघत आहेत. दोघांची देहबोली बरीच बोलकी आहे. या बोलक्या छायाचित्रणाची सर्वत्र चर्चा आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत