चंद्रपूर जिल्ह्यातील मधूगंधा MPSC परीक्षेत उत्तीर्ण #chandrapur #Rajuraचंद्रपूर:- महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग MPSC 2021 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा शहरातील मधूगंधा गौतम जुलमे महाराष्ट्र राज्यातून अनुसूचित जाती महिला प्रवर्गात प्रथम आली (Schedule Cast Women Category) तसेच महाराष्ट्र राज्याच्या गुणवत्ता यादीत 60 वा क्रमांक पटकावला.

मधूगंधा जुलमे हिने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा कृषी विभागामार्फत दिली तिची निवड कृषी उपसंचालक पदी निवड झाली आहे.

राजूरा येथील सर्व सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी तिच्या राहते घरी तिचे आणि तिच्या आई वडिलांचे पुष्पगुच्छ आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे पुस्तक देऊन अभिनंदन करण्यात आले.

यावेळी मार्शल विवेक बक्षी, मार्शल निवारण कांबळे, प्राचार्य शुध्दोधन निरंजने, सिद्धार्थ नळे, निरंजन फुसाटे, गौतम जी देवगडे, विनोद निमसरकर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत