Top News

नगरपंचायत हद्दीत अनधिकृत बांधकाम #chandrapur #gondpipari


आदेशाची पायमल्ली करून बांधकाम सुरूच


गोंडपिपरी:- नगरपंचायतीच्या हद्दीत येणाऱ्या प्रभाग क्रमांक ११ येथील आनंदराव गोविंदा झाडे आणि बंडू गोविंदा झाडे यांच्या वादग्रस्त जागेवर अनधिकृत घराचे बांधकाम करण्यात येत असल्याची तक्रार करण्यात आली होती. त्या तक्रारीवरून १९ एप्रिलला नगर पंचायतने घरमालकाला सदर घराचे बांधकाम थांबविण्याबाबत नोटीस बजावली. परंतु संबंधित घरमालक नगर पंचायतच्या आदेशाची अवहेलना करत दिलेल्या फर्मानला झुगारून आपल्या स्वमर्जिने घराचे बांधकाम सुरूच ठेवले आहे. असे त्यांचे प्रतिस्पर्धी किशोर झाडे यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा

प्रभाग क्रमांक ११ मधील गट क्रमांक १०, भूमापन क्रमांक १६० हि जागा सामुहिक हिश्याची असुन जागेचे अद्यापही वाटणी झाली नाही. जागेवर आठ वारसदारांनी नावे नोंद आहेत. त्यात किशोर देवाजी झाडे देखील हिस्सेदार आहे. परंतु आनंदराव झाडे आणि गोविंदा झाडे व त्यांचे इतर वारसदारांनी किशोर झाडे यांना डावलून त्यांची कोणतीही सहमती न घेता सदर जागेवर घराच्या बांधकाम सुरुवात केले आहे. हे प्रकरण किशोर झाडे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी नगर पंचायतला रितसर तक्रार दाखल केली.


कायद्याने कोणत्याही बांधकामाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. परंतु आनंदराव गोविंदा झाडे आणि बंडू गोविंदा झाडे यांनी नगर पंचायतची परवानगी न घेताच बांधकामाला सुरुवात केली. प्रभाग क्रमांक ११ मधील जागेवर होत असलेले बांधकाम हे अनधिकृत असुन त्या बांधकामास स्थगिती देण्यात यावी या विषयीचे पत्र नगर पंचायतने संबंधित घरमालकाला दिले. तरी देखील संबंधितांनी नोटिसाला केराची टोपली दाखवून निडरपणे बांधकाम केल्या जात आहे. यावर नगर पंचायत घर मालकावर महाराष्ट्र राज्य नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम ५२, ५३, ५४ अन्वये गुन्हा दाखल करून कार्यवाही करणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने