चंद्रपूर जिल्ह्यात वीज पडून 36 बकऱ्यांचा मृत्यू #chandrapur #Korpana

(आधार न्युज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) मुबारक शेख, कोरपना
कोरपना:- अवकाळी पावसामुळे मागील काही दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांचं खूपच नुकसान झालं. दि. २४ एप्रिलला पडलेल्या अवकाळी पावसामुळे कोरपना तालुक्यातील बिबी शेत शिवारात वीज पडून 36 बकऱ्यांचा मृत्यू झाला.

हेही वाचा

मृत बकऱ्या जब्बार खाजा मिया कुरेशी यांच्या मालकीच्या आहेत. मृत झालेल्या जनावरांमध्ये 18 बकऱ्या आणि 18 मेंढ्या आहेत. या घटनेमुळे शेतकऱ्यांचे अंदाजे 3 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत