Google ads.
बल्लारपूर:- घराच्या जिन्यावर चढताना तोल गेल्याने खाली पडून खुशाब महादेव पिदूरकर वय ४८ यांचा मृत्यू मृत्यू झाला. ही घटना दि. १५ मेला दुपारच्या सुमारास बल्लारपूर तालुक्यातील कोठारी गावात घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार बल्लारपूर तालुक्यातील कोठारी येथील खुशाब महादेव पिदूरकर हे आपल्या स्वतःच्या घराच्या स्लॅबवर जिन्यावरून चढताना तोल गेल्याने जमिनीवर पडल्याने मृत्यू झाला. खुशाबच्या मृत्यूमुळे कुटुंब शोक सागरात बुडाले आहे. म्हातारी आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा बराच मोठा परिवार असून खुशाबच्या अचानक जाण्याने गावात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.