Google ads.
चंद्रपूर:- फिर्यादी सरिता प्रवीण स्वान वय 50 राहणार महावीर नगर हे नेहमी प्रमाणे सकाळी ०८:०० वा घराला कुलूप लावुन कामावर गेली असता रात्रौला ११:०० वा घरी कामावरूण परत आली असता घराचे कुलूप खोलण्यास गेली तेव्हा कुलूप खुले दिसले कुलूप दाराच्या कोड्याला लटकलेला दिसला व घरात प्रवेश करूण पाहीले असता घरातील आतील रूमच्या दाराचा कडा तुटून दार खुले दिसले व खोलीमध्ये लाकडी आलमारीचा पल्ला उघडा दिसला व अलमारीत ठेवलेले स्टीलचे ४ डब्बे व २ टिनाचे डब्बे ज्यात सोन्याचे मंगल सूत्र वजन अंदाजे 28 ग्राम किम्मत 1 लाख 45,000 , सोन्याचे कानातील टॉप्स वजन अंदाजे 4.50 ग्राम किम्मत 24,700, सोन्याचे कानातील वेल 4.50 ग्राम 18,000 असा अकून 1,87,700 च्या माल दिसुन आले नाही कोणीतरी अज्ञात इसमाने चोरून नेले अश्या फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून गुन्हा नोंद करून तपासात घेतला.
सदर गुन्हयाच्या तपासात अज्ञात आरोपीचा शोध घेण्या करीता सहाय्यक पुलिस निरीक्षक मंगेश भोंगड़े सोबत डि.बी. पथका सह रवाना होवुन परीसरात आरोपीचा शोध घेतला असता मुखबीर कडुन माहीती मिळाली की, रेकॉर्ड वरील आरोपी नामे १) संदीप मनोहर चौधरी वय २८ वर्ष २) इरफान सरवर शेख वय २४ वर्ष दोन्ही रा. महावीर नगर भिवापुर वार्ड चंद्रपुर हे एक लाल रंगाचा गॅस सिलेन्डर व सोन्याचे दागीने विकण्याकरीता परीसरात फिरत आहे. तेव्हा त्याचा शोध घेत असता माहीती मिळाली की, दोन्ही रेकॉर्ड वरील आरोपी संदीप चौधरी यांचे घरी महावीर नगर येथे आहे. तेव्हा त्याचे घरी जावुन घरझडती घेतली असता त्याचे घरी लाल रंगाचा घरगुती वापराचा एच.पी. कंपनीचा गॅस सिलेन्डर मिळुन आला. तेव्हा त्यांना सदर गॅस सिलेन्डर बाबत चौकशी केली असता त्यांनी दि. १३/०५/२०२३ रोजी महावीर नगर येथे एक बंद घराचे कुलुप खोलुन चोरी केल्याचे कबुल केले. तेव्हा आरोपीता कडुन १) सोन्याचे मंगळसुत्र वजन अंदाजे २८ ग्रॅम किमत १,४५,०००/- रूपये २) सोन्याचे कानातील टॉप्स वजन अंदाजे ४.५० ग्रॅम किंमत २४,७००/- रूपये ३) सोन्याचे कानातील वेल वजन ४.५ ग्रॅम किंमत १८,०००/- रूपये ४) एक लाल रंगाचा घरगुती वापराचा एच.पी. कंपनीचा गॅस सिलेन्डर किंमत १००० / रूपये व घराचे कुलुप खोलण्या करीता वापरलेला लोखंडी व्हिल पाना किंमत ५०० / रूपये असा एकुण १,८९,२००/-रूचा माल, पंचा समक्ष जप्त करून आरोपी क. १) संदीप मनोहर चौधरी वय २८ वर्ष २) इरफान सरवर शेख वय २४ वर्ष दोन्ही रा. महावीर नगर भिवापुर वार्ड चंद्रपुर यांना अटक करण्यात आले आहे.
सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक रविद्रसिंह परदेसी , अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु , उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीषसिंह राजपुत तसेच सहाय्यक पुलिस निरीक्षक मंगेश भोंगाडे यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथक कर्मचारी शरीफ शेख, विलास निकोडे, महेंद्र बेसरकर, जयंत चुनारकर, सचीन बोरकर, संतोष पंडित, चेतन गज्जलवार, चेतन, इम्रान खान , इर्शाद, दिलीप कुसराम, संतोष कावड़े, रूपेश रणदिवे, प्रमोद डोंगरे यांनी केली. व पुढील तपास सहाय्यक पुलिस निरीक्षक मंगेश भोंगाडे हे करीत आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत