खा. बाळू धानोरकर यांना अखेरचा निरोप देण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी #chandrapur #BaluDhanorkar

Bhairav Diwase

जड अंतकरणाने चंद्रपूरकरांचा लाडक्या नेत्याला निरोप

चंद्रपूर:- कॉंग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार बाळू धानोरकर यांचे काल (ता. ३०) पहाटे दिल्लीतील मेदांता हॉस्पिटलमध्ये निधन झाले. एअर ॲम्ब्यूलन्सने काल त्यांचे पार्थिव त्यांच्या गावी वरोरा येथे आणण्यात आले. आज सकाळी निवासस्थानाहून अंत्ययात्रा निघाली आणि वरोरा-वणी मार्गावरील मोक्षधाम येथे शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

चंद्रपूरचे दिवंगत खासदार बाळू धानोरकर अनंतात विलीन झाले आहेत. वरोऱ्यात त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. बंदुकीच्या फैरी झाडून पोलीस दलाकडून सलामी देण्यात आली. मोक्षधाम या ठिकाणी अत्यंत शोकाकुल वातावरणात बाळू धानोरकर यांना निरोप देण्यात आला. दोन्ही मुलांनी मिळून वडिलांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांसह मोठा जनसमुदाय इथे आला होता.
चंद्रपूर जिल्हा, विदर्भ आणि राज्यभरातून सर्व पक्षीय नेते, हजारो कार्यकर्ते धानोरकरांना अखेरचा निरोप देण्यासाठी आले होते. त्यांच्या निवासस्थानाहून अंत्ययात्रा निघाल्यानंतर मार्गात ठिकठिकाणी लोकांनी आपल्या लाडक्या नेत्याला निरोप देण्यासाठी गर्दी केली होती. तापत्या उन्हातही लोक रस्त्याच्या दुतर्फा गोळा झाले होते.