एल. एम. बी. पब्लिक स्कूल च्या विद्यार्थ्याचे सुयश #chandrapur #bramhapuri

Bhairav Diwase
0
रुपक चाहांदे ब्रम्हपुरी तालुक्यात प्रथम


Google ads.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) संजय बिंजवे, ब्रम्हपुरी 
ब्रम्हपुरी:- स्थानिक ब्रम्हपूरी येथील एल.एम.बी पब्लिक CBSE स्कुल च्या सलग पाचव्या वर्षाच्या दहावीच्या १००% टक्के निकालाच्या मालिकेत या वर्षी च्या २०२२-२०२३ च्या निकालाची उत्तम भर पडलेली आहे.एन.एच.ऐजुकेशन सोसायटी गेल्या अनेक वर्षा पासुन आपल्या विविध शाखेतून शिक्षणाचा दर्जा अधिकाधिक उंचावित अनेक शिखर गाठित आकाशाला गवसणी घालित आहे आणि ही यशाची मालिका अविरत सुरु राहिल यात काही शंका नाही. याच सोसायटी च्या एल.एम.बी पब्लिक स्कुल या शाखेने सुध्दा ही परंपरा कायम राखुन आता पर्यंत सलग पाचव्या वर्षी CBSE १० वी बोर्डचा १००% निकाल देउन पोच पावती दिली आहे.
या वर्षी सुध्दा २०२२-२०२३ दहावी च्या विद्यार्थ्यांनी दरवर्षीच्या तुलनेत उत्तम टक्केवारीत बाजी मारुन निकालात भर पाडलेली आहे या मध्ये रुपक चाहांदे या विद्यार्थ्याने ९५.४०% प्राप्त करुन फक्त स्कुल स्तरावर नाही तर संपूर्ण ब्रम्हपुरी तालुक्यातून प्रथम कमांक पटकावला आहे ही आमच्या साठी गौरवाची बाब आहे तसेच स्वरा कावळे हिने ९५.००% प्राप्त करून व्दितीय क्रमांक आणि भुवणेश्वरी नवखरे हिने ९४.६०% प्राप्त करून तिसरा कमांक पटकाविला आहे तसेच अर्थव चिलबुले याने ९४.४०% प्राप्त करुन चौथा क्रमांक पटकाविला आहे.तसेच स्वयंम मानापुरे याने ९४.०० टक्के प्राप्त करून पाचवा क्रमांक पटकाविलेला आहे.

या वर्षीच्या CBSE १० वी च्या सर्व विद्यार्थ्यानी निकालात मारलेल्या उत्तम बाजी साठी आणि त्यांनी प्राप्त केलेल्या घवघवित यशाबदद्ल एन.एच.शिक्षण संस्थेचे सचिव अशोकजी भैया सर तसेच स्कुलच्या संचालिका डॉ.तेजस्विनी कावळे मॅडम व शाळेचे प्राचार्य कादिर कुरेशी सर तसेच स्कुलचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी या सर्वांनी सर्व विद्यार्थ्याचे व त्याच्या पालकाचे अभिनंदन करुन कौतुक केले आणि त्याना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)