Google ads.
नागपूर:- उपराजधानीतील दीक्षाभूमी मार्गावर शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता एका धावत्या कारने अचानक पेट घेतला. वेळीच कारमधील चालक खाली उतरल्याने मोठा अनर्थ टळला. परंतु आगीवर नियंत्रण मिळण्यापूर्वी कार जळून खाक झाली. सदर कार ही मनिष मरखेडे यांच्या मालकीची असून ती साहिल गोपसे हा चालक चालवत होता.
शुक्रवारी सकाळी दीक्षाभूमी परिसरातून जात असताना अचानक त्यातून धूर निघताना चालकाला दिसला. चालक वेळीच ब्रेक दाबून खाली उतरला. दरम्यान तातडीने ही माहिती अग्निशामन दलाला दिली गेली. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा केल्यावर काही वेळात आगिवर नियंत्रण मिळाले.