Google ads.
चंद्रपूर:- बल्लारपूर ते चंद्रपूर जाणाऱ्या मार्गावरील बाबूपेठ परिसरातील डॉ. लोढिया हॉस्पिटल जवळील रेल्वे रुळावर एका इसमाचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला आहे. सदर मृतक इसमाची ओळख पटलेली नसून पोलिसांची शोध मोहीम सुरू आहे.
सदर मृतक इसम साधारण 35 ते 37 वर्षे वयो दरम्यान असून त्याच्या उजव्या हातावर दिल काढले असून त्यात ए एस असे गोंदवलेले आहे.
सदर इसमाची ओळख पटल्यास चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन चंद्रपूर शहर पोलिसांनी केले आहे.