पोंभुर्णा बाजार समितीच्या सभापतीपदी मरपल्लीवार व उपसभापतीपदी आशिष कावटवार यांची निवड #chandrapur #pombhurna

Bhairav Diwase

Google ads.
पोंभुर्णा:- अतिशय प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या पोंभुर्णा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आज सभापती व उपसभापती पदासाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुध्द भाजपा अशी लढत होत सभापाती, पदाकरिता महाविकास आघाडीकडून रवि मरपल्लीवार उपसभापती पदाकरिता आशिष कावटवार तर भाजपाकडून सभापती पदाकरीता नैलेश चिचोलकर तर उपसभापती करीता धनराज सातपुते यांच्यात लढत होती. ११ विरुध्द ७ ने मात करीत महाविकास आघाडीने विजय संपादन केला.

महाविकास आघाडीने खासदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर व माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या मार्गर्शनाखाली माजी काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, शिवसेना जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे व माजी जि. प. उपाध्यक्ष विनोद अहिरकर यांच्या नेतृत्वाखाली रवी मरपल्लीवार यांची सभापती पदासाठी तर उपसभापतीपदी आशिष कावटवार यांची ११ विरुद्ध ७ मतांनी निवड करण्यात आली आहे.

पोंभुर्णा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवणुकीत महाविकास आघाडी पॅनलचे १८ पैकी १२ संचालक निवडूण आले होते. पोंभुर्णा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवडणूक घेण्यासाठी आज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात १२ वाजता विशेष सभा घेण्यात आली. यात सभापती पदासाठी मरपल्लीवार यानी तर उपसभापती पदासाठी आशिष कावटवार यानी नामनिर्देशपत्र भरले. सभापती व उपसभापती पदासाठी दोन - दोन अर्ज आल्याने निवडणूक होत बहुमताने निवड करण्यात आली.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व संचालक उपस्थित होते. निवडणुकी साठी प्राधिकृत अधिकारी म्हणुन सावलीचे सहाय्यक निबंधक सहकारी संस्था तुपट व सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन सहा. सहकार अधिकारी सरपाते यांनी काम पाहिले.