वाजत-गाजत वरात निघाली; वाटेतच काळाचा घाला #chandrapur #ballarpur #accident

Bhairav Diwase
0

५० वऱ्हाड्यांसह बस थेट नाल्यात कोसळलीGoogle ads.
बल्लारपूर:- लग्नावरुन परत येत असताना बसचा मोठा अपघात झाला आहे. या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून ६ प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. तर २० जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, बसमध्ये एकून ५० प्रवासी होते. मुल तालुक्यातील अनिल विलास मडावी यांचा विवाह बल्लारपूर येथे होता. बल्लारपूर येथून विवाह झाल्यावर वरात नांदगावात येत होती. दरम्यान, किन्ही गावाजवळच्या वळणावर बसचा भीषण अपघात झाला. वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट नाल्यात पलटी झाली. रात्री झालेल्या अपघातानंतर स्थानिकांनी जखमींना बाहेर काढून रुग्णालयात नेले. चंद्रपूर- बल्लारपूर- कोठारी-पोंभुर्णा पोलीस ठाण्याच्या पथकांनी घटनेची माहिती मिळताच येथे धाव घेतली.

या दुर्दैवी घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला आहे. सुनंदा हरिदास मडावी असे मृतक महिलेचे नाव आहे. त्यामुळे कुटुंबात हळहळ व्यक्त केली जात आहे. हा अपघात इतका भीषण होता की, बस नाल्यात कोसळताच काही प्रवाशी बसबाहेर फेकले गेले. यात ६ जण गंभीर जखमी आहेत. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)