आता आरोग्य व स्वच्छते विषयी ब्रम्हपुरी न. प. 'ऍक्शन मोडवर' #chandrapur #bramhapuri

Bhairav Diwase
0

आरोग्य सभापती दीपक शुक्ला यांच्या प्रत्यक्ष निगराणीत ब्रम्हपुरीचे होणार कायापालट

https://www.adharnewsnetwork.com

Google ads.

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) संजय बिंजवे, ब्रम्हपुरी
ब्रम्हपुरी:- आरोग्य आणि शिक्षणाच्या बाबतीत ब्रम्हपुरीचे नावलौकिक आहे.'विदर्भाचे पुणे' अशी ख्याती मिळवलेले शहर अलिकडे अंतर्गत स्वच्छतेबाबत गचाळपणा दिसून येत असल्याने येथील नगरपरिषदचे आरोग्य सभापती कर्तव्यदक्ष दीपक शुक्ला यांच्या पुढाकाराने ब्रम्हपुरीची आरोग्य व स्वच्छता आता टापटीप असणार आहे.

ब्रह्मपुरी चहूबाजूने वाढत चालली आहे.नवनवीन वस्त्या तयार होत आहेत.विकासकामे करताना आव्हान ही आहेतच;परंतु ब्रम्हपुरी मध्ये अंतर्गत स्वच्छता आणि आरोग्य या बाबत उदासीनता दिसून येत होती.स्वछता करणारे मनुष्यबळ कमी,नाली गटारे तुंबून असल्याने आरोग्य विषयक समस्यांना सामोरे जावे लागते ही बाब लक्षात घेऊन स्वतःआरोग्य सभापती दीपक शुक्ला यांनी शहराचा कानाकोपऱ्याचा जायजा घेतला.नाल्या गटारे सुरळीत करण्यासाठी पुरेसा मजुरवर्ग आणि जेसीबीच्या सहाय्याने पावसाळ्याआधीच स्वछता अभियान राबविले आहे.

शहरातील नाल्या गटारे यामधील सांडपाण्याचा विल्हेवाट योग्य व्हावा या दृष्टीने सदर विभाग गंभीरतेने काम पाहणार आहे.शहरांतर्गत कुठेही घाण दिसता कामा नये यासाठी २४ वरून ७० स्वच्छता कर्मचारी सेवेत लावण्यात येणार असल्याचे आणि शहरातील सर्व शौचालये आणखी सुदृढ करण्यात येणार असल्याचे शुक्ला म्हणाले.रस्त्यावर झिल्ली,खर्रापन्नी यावर नियंत्रण आणण्यासाठी पानटपरी चालवनाऱ्यांना तश्या सूचना देण्यात येणार असून जर यात हयगय करण्यात आली तर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे ते बोलले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)