मानव मुक्तीच्या कल्याणासाठी बुद्धांशिवाय पर्याय नाही:- डॉ.स्निग्धा कांबळे #chandrapur #bramhapuri

Bhairav Diwase

गांगलवाडी येथे समता सैनिक दलाच्या कार्यक्रमात केले प्रतिपादन


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) संजय बिंजवे, ब्रम्हपुरी 
ब्रम्हपुरी:- या जगात सर्वप्रथम वैज्ञानिक दृष्टिकोन दिला,भारतात ज्यांनी अंधश्रद्धा, रुढीपरंपरा, कर्मकांड यांवर सर्वप्रथम प्रहार केला ते विश्वगुरू महाकारूणी तथागत गौतम बुद्ध.त्यांची विचारधारा उत्तरोत्तर वृद्धिंगत करण्याचे संकल्प बाळगून बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने गांगलवाडी येथे समता सैनिक दलाची महिला शाखा स्थापन करण्यात आली.
समता सैनिक दल शाखा स्थापनेचा कार्यक्रम दोन सत्रांमध्ये पार पडला.पहिल्या सत्रात दलातील महिला सैनिक यांनी व बौद्ध बांधवांनी गावातून रॅली काढून बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन केले. यावेळी समता सैनिक दल कार्याध्यक्ष अभीमन मेश्राम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. समता सैनिक दल उद्घाटन सोहळा कार्यक्रम दुसऱ्या सत्रात पार पडला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून दिव्यदीप बहुउद्देशीय संस्था ब्रह्मपुरी या एनजीओचे अध्यक्ष डॉ स्निग्धा कांबळे ह्या उपस्थीत होत्या. मानव मुक्तीच्या कल्याणासाठी बुद्धांशिवाय दुसरा पर्याय जगाला उपलब्ध नाही असे मत त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त करतांना गौतम बुद्धांच्या विचारातूनच आनंदी आणि मुक्त जीवन जगणे शक्य आहे असे म्हणत,समता सैनिक दलाची महिला शाखा स्थापन करणे म्हणजे एक चाकोरीबद्ध जीवनातून बाहेर पडून समाजासाठी कार्य करण्याचा मार्ग महिलांनी शोधणे होय असे आपल्या अध्यक्षीय भाषणाची सांगितले.
सदर कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून उपस्थित असलेले ब्रम्हपुरी चे सामाजिक कार्यकर्ता गिरीधर बारसागडे यांनी बुद्धाशिवाय इथल्या इतिहासाची कल्पना करणे अशक्य आहे हे सांगत बुद्धांचे महत्त्व अधोरेखित केले.प्रमुख मार्गदर्शन म्हणून बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे विभागीय अध्यक्ष विजय बंसोड यांनी बुद्धांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण बाबी, सध्याची सामाजिक, आर्थिक,राजकीय परिस्थिती यावर आपले विचार व्यक्त केले.कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले ब्रह्मपुरीचे सामाजिक कार्यकर्ता वैकुंठ टेंभुर्णे यांनी बाबासाहेबांनंतर बौद्ध समाजाची भूमिका कोणत्या स्वरूपात असायला पाहिजे याविषयी मत व्यक्त केले.प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले काँग्रेस पक्षाचे तालुका कार्याध्यक्ष प्रभाकर सेलोकर व माजी सरपंच गांगलवाडी ज्ञानेश्वर भोयर यांनी नव्याने स्थापन झालेल्या शाखेस शुभेच्छा दिल्या व समता प्रस्थापित करण्यासाठी कार्य करत राहावे असे आवाहन केले.विशेष प्रमुख पहुण्यामध्ये समता सैनिक दलाचे कार्याध्यक्ष अभिमन बंसोड,समता सैनिक दल ट्रेनिंग चीफ पुरुषोत्तम भैसारे, दुर्गे सर,ज्योतिबा मेश्राम,छाया दामले,देवदास डांगे,हरिदास डांगे, इंजी.बोदेले आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रस्तावनेतून पुरुषोत्तम भैसारे यांनी बाबासाहेबांची समता सैनिक दल स्थापन करण्याची भूमिका काय?त्याची ध्येय कोणते होते?उद्दिष्ट काय?यावर सविस्तर मार्गदर्शन केले.सदर कार्यक्रमाचे संचालन सतीश डांगे यांनी केले तर आपण प्रदर्शन महेंद्र बोरकर यांनी पार पाडले.यशस्वीरित्या पार पडलेल्या कार्यक्रमासाठी आयोजक समता सैनिक दल गांगलवाडी,समस्त बौद्ध समाज गांगलवाडी,विश्वशांती बुद्धविहार गांगलवाडी यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.