"आधार" नव्या दमाने वाचकांच्या सेवेत #chandrapur #gadchiroli #Adharnewsnetwork #bhairavdiwase

चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते आधार न्युज नेटवर्कच्या नवीन लोगोचे अनावरण

जिल्हाधिकारी विनय गौडा यांचीही उपस्थिती

https://www.adharnewsnetwork.com

Google ads.

चंद्रपूर:- आधार न्यूज नेटवर्कने तीन वर्षांत मोठी झेप घेत वाचकांच्या मनात बातमीच्या माध्यमातून दखल घेण्यासाठी भाग पाडलेले आहे. नव्या दमानं आधारने आपलं लोगो वाचकांच्या सेवेत आणलं आहे. चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते आधार न्युज नेटवर्कच्या नवीन लोगोचे अनावरण दि. २० मे २०२३ ला चंद्रपूर नियोजन भवन येथे करण्यात आले. निर्भिड व निष्पक्ष व्यासपीठ हि नवी संकल्पना घेऊन आधार वाचकांच्या समोर येत आहे.

नियोजन भवन येथे पार पडलेल्या लोगो अनावरणावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा, भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, भाजपा जिल्‍हा महामंत्री नामदेव डाहूले, आधार न्युज नेटवर्क चे मुख्य संपादक भैरव धनराज दिवसे, मुख्य उपसंपादक राहुल थोरात, कोरपना ग्रामीण प्रतिनिधी मुबारक शेख यांची उपस्थिती होती. तसेच सौरभ चौधरी सावली, जितेंद्र माहुरे भद्रावती, रत्नाकर पायपरे राजुरा, सतीश बिडकर कोरपना, सुनिल राठोड जिवती, रितेश एस. आसमवार चामोर्शी, विरेंद्र का. मेश्राम सिंदेवाही, जगत सिंग वधावन विरुर स्टेशन राजुरा, संजय बिंजवे ब्रम्हपुरी, शार्दुल पचारे चिमूर यांचे सहकार्य लाभले.

१ कोटी ३३ लाख वाचकांच्या पसंतीस उतरलेलं आधार न्यूज नेटवर्क निर्भीड, निष्पक्ष व सत्य, बातमी प्रकाशित करून चंद्रपूर जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम आधारने केले आहे. बेरोजगारांचे प्रश्न, शेतकऱ्यांच्या व्यथा सरकार पर्यंत पोहोचवण्याचा ठळक काम आधारने केला आहे. दुर्गम भागातील घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी, सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आधारने नेहमीच पुढाकार घेतला आहे. म्हणूनच तीन वर्षांत वाचकांनी भरभरून प्रेम दिले आहे. कौतूक केल्यानेच आधारने कात टाकत एक पाऊल पुढे म्हणून नवीन लोगो वाचकांसमोर ठेवला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत