Click Here...👇👇👇

धक्कादायक! आगीच्या धुरात गुदमरून दोन तरुणांचा झोपेतच मृत्यू #chandrapur #gadchiroli #nagpur #Fire

Bhairav Diwase

नागपूर:- नागपूरच्या इमामवाडा परिसरात आगीच्या धुरात गुदमरून दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ज्यावेळी घटना घडली तेव्हा हे दोघे तरुण झोपेत होते. त्यामुळे त्यांच्या झोपेतच मृत्यू झाला असावा असा अंदाज पोलीसांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा:- महाराष्ट्र दिनी गडचिरोलीत घडला होता रक्तपात

नागपूर शहरातील इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोघा जणांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. शॉटसर्किटमुळे लागलेल्या आगीत घराच्या खोलीत धुराचे साम्राज्य निर्माण झाले. त्यात गुदमरून दोघांचा मृत्यू झाला आहे. आकाश रजत आणि अमान तिवारी अशी मृतकांची नावे आहेत.
झोपेतच गुदमरून मृत्यू

आकाश आणि अमान हे दोघेही आनंद पब्लिक शाळेच्या शेजारी असलेल्या खोलीत राहत होते. हे दोघेही मध्य प्रदेशाचे रहिवासी असून नागपूर शहरात ते फ्लेक्स बोर्ड तयार करण्याचे काम करत होते. काल रात्रीच्या सुमारास त्यांच्या खोलीतील विजेचा बोर्डला शॉर्टसर्किटमुळे आग लागली त्यामुळे निघालेल्या धुरामुळे दोघांचा गुदमरून मृत्यू झाला. ज्यावेळी घटना घडली तेव्हा आकाश आणि अमान दोघेही झोपेत असल्याने त्यांना काही कळण्यापूर्वीच दोघांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज पोलीसांनी व्यक्त केला आहे.

नातेवाईक घरी आल्यानंतर झाला खुलासा

मृतक आकाश रजत आणि अमान तिवारी या दोघांशी कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाही म्हणून त्यांचे नातेवाईक दुपारी त्यांच्या घरी आले. घरातून या दोघांचा कोणताही प्रतीसाद मिळत नसल्याने नातेवाईकांनी घराचा दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला. तेव्हा ते दोघेही मृतावस्थेत दिसून आले. त्यानंतर लगेच या घटनेची माहिती इमामवाडा पोलीस ठाण्याला कळवण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोन्ही मृतदेह तपासणीसाठी पाठवला असून पुढील तपास सुरू केला आहे.