आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेमध्ये सरदार पटेल महाविद्यालयाचे यश #chandrapur #gadchiroli

Bhairav Diwase
0

महाविद्यालयाने ११ प्रथम, ०५ द्वितीय तर ०६ तृतीय क्रमांक पटकाविला

https://www.adharnewsnetwork.com

Google ads.

चंद्रपूर:- गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली (Gondwana university gadchiroli) अंतर्गत 2022-23 मध्ये आंतर महाविद्यालय क्रीडा स्पर्धा संपन्न झाली. ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना खेळाची आवड निर्माण व्हावी, शिक्षणासोबत खेळाला वाव मिळण्यासाठी आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले जातात. गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली क्रिडा व शारीरिक शिक्षण विभागाने आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धामध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविलेल्या महाविद्यालयाचा अहवाल गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग संचालक डॉ. अनिता लोखंडे यांनी सादर केला. 
#Gondwanauniversitygadchiroli  

विविध प्रकारच्या २३ खेळांचा समावेश

गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत 2022 -23 मध्ये आंतर महाविद्यालय क्रीडा स्पर्धेत हॉकी, व्हॉलीबॉल, खो-खो, कबड्डी, तिरंदाजी, मलखांब, बॅडमिंटन, क्रॉस कंट्री, टेबल टेनिस, बुद्धिबळ, बास्केटबॉल, ॲथलेटिक्स (पुरुष आणि महिला चॅम्पियनशिप), सॉफ्टबॉल, नेटबॉल, सेपक टकरा, सर्कल स्टाईल कबड्डी, कॉर्फबॉल (मिश्र), बॉल बॅडमिंटन, क्रिकेट, फुटबॉल, हँडबॉल, हॉकी, टॅग ऑफ वार असे एकूण २३ खेळाचा समावेश करण्यात आला. या खेळात महाविद्यालयातील पुरूष व महिला खेळाडूंनी सहभाग घेतला. #SardarPatelmahavidyalayachandrapur 

सरदार पटेल महाविद्यालयाचे यश

गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत 2022-23 मध्ये आंतर महाविद्यालय क्रीडा स्पर्धा संपन्न झाली. या विविध प्रकारच्या २३ खेळात सरदार पटेल महाविद्यालयातील (Sardar Patel mahavidyalaya chandrapur) पुरुष व महिला खेळाडूंनी सहभाग घेतला. विविध खेळात सरदार पटेल महाविद्यालयातील पुरुष व महिला खेळाडूंनी प्राविण्य प्राप्त करून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला आहे. या विविध प्रकारच्या २३ खेळात सरदार पटेल महाविद्यालयातील (s. p. college chandrapur) पुरुष व महिला खेळाडूंनी खेळात ११ प्रथम, ०५ द्वितीय तर ०६ तृतीय क्रमांक पटकाविला आहे. #spcollegechandrapur #DepartmentofSports


सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर पुरुष व महिला खेळाडू विजेते 

व्हॉलीबॉल:- द्वितीय पुरूष व प्रथम महिला

खो-खो:- प्रथम महिला

क्रॉस कंट्री:- तृतीय महिला

टेबल टेनिस:- तृतीय पुरूष

बुद्धिबळ:- प्रथम पुरुष व प्रथम महिला

ॲथलेटिक्स (पुरुष आणि महिला चॅम्पियनशिप):- व्दितीय क्रमांक (पुरुष आणि महिला)

नेटबॉल:- व्दितीय पुरुष व तृतीय महिला

सेपक टकरा:- तृतीय पुरूष व द्वितीय महिला

सर्कल स्टाईल कबड्डी:- तृतीय पुरुष व प्रथम महिला

बॉल बॅडमिंटन:- प्रथम पुरुष व प्रथम महिला

क्रिकेट:- तृतीय पुरुष

फुटबॉल:- प्रथम पुरुष व प्रथम महिला

हँडबॉल:- प्रथम महिला

टॅग ऑफ वार:- प्रथम पुरुष व व्दितीय महिला

महाविद्यालयांतील खेळाडू संघाच्या यशाबद्दल अभिनंदनाचा वर्षाव

महाविद्यालयांतील संघाच्या यशाबद्दल सर्वोदय शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा सुधाताई पोटदुखे, कार्यकारी अध्यक्ष अरविंद सावकार पोरेड्डीवार, उपाध्यक्ष तथा माजी आमदार सुदर्शन निमकर, सचिव प्रशांत पोटदुखे, सहसचिव तथा गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीचे माजी कुलगुरू डॉ. किर्तीवर्धन दिक्षित, सदस्य सगुणाताई तलांडी, राकेश पटेल, एस. के. रमजान, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद एम. काटकर, उपप्राचार्य डॉ. स्वप्निल माधमशेट्टीवार, प्रभारी प्रबंधक विनोद चोपावार, क्रिडा व शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. विजय ए. सोमकुंवर, डॉ. कुलदीप आर गोंड तसेच प्राध्यापकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)