चालत्या गाडीवर अंघोळ करणे महागात पडले #chandrapur #socialmedia #Viralvideo

Bhairav Diwase

पोलिसांकडून रील्स बनवणाऱ्यांवर गुन्हा दाखल

https://www.adharnewsnetwork.com

Google ads.

उल्हासनगरमधील आदर्श शुक्ला आणि एका तरुणीने वाढत्या गर्मीवर उपाय शोधला. दुचाकीवर पाण्याची बादली आणि मग घेऊन फिरत चालत्या गाडीवर अंगावर पाणी ओतून घेत असतानाचा एक व्हिडिओ तयार केला होता.

हा व्हिडिओ रिल्सच्या स्वरूपात इन्स्टाग्रामवर अपलोड करण्यात आला होता. हा व्हिडिओ उल्हासनगरमध्ये चांगलाच व्हायरल झाला होता. माध्यमांनीही या व्हिडिओची बातमी प्रसारित केली होती.

व्हिडिओ व्हायरल होताच उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलिसांनी ही रील्स तयार करणारा तरुण आदर्श शुक्ला आणि त्याच्या मागे बसलेल्या तरुणी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. भादंवि 279 आणि मोटर वाहन कायद्यान्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.