नको तिथे रील्स बनवण्याची हौस महागात पडली #chandrapur #gadchiroli #nagpur #Mumbai #railway #reels

रील्स बनवताना क्रॉसिंग करत होते अन् तितक्यात.

https://www.adharnewsnetwork.com

Google ads.

रेल्वे अपघातात मृत्यूची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यात स्टंटबाजी करणे, रेल्वे ट्रॅक ओलांडताना आणि चालत्या गाडीतून चढताना किंवा उतरताना अनेक प्रवाशांना आपला जीव गमावावा लागत आहे.

यासाठी रेल्वे प्रशासन नेहमी आव्हान करून देखील प्रवासी ऐकत नसल्याने अपघात दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. अशाच प्रकारे सोमवारी सायंकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान डोंबिवली लोहमार्ग ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक अर्चना दुसाने यांना डोंबिवली-ठाकुर्ली दरम्यान दोन तरुणांना रेल्वेने धडक दिल्याची माहिती मिळाली.

रील्स बनवताना क्रॉस करताना तरुणांना रेल्वेने धडक दिली. माहिती मिळताच डोंबिवली लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे पोलीस यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या धडकेत या दोन्ही तरुणाचा जागीच मृत्यू झाला होता. पोलिसांनी पंचनामा करत या दोन्ही तरुणाचा मृतदेह ताब्यात घेतले. पोलिसांच्या माहितीनुसार चेतन गोगावले आणि सुयोग उत्तेकर अशी दोघांची नावे आहेत. हे दोघेही डोंबिवली पूर्वेतील रहिवासी आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत