Top News

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वातंत्र्यसैनिक व त्यांच्या जोडीदारांचा होणार सत्कार #chandrapur #DIOchandrapur

स्वातंत्र्य सैनिकांनी हयातीचा दाखला जमा करावा

https://www.adharnewsnetwork.com

Google ads.

चंद्रपूर:- स्वातंत्र्य सैनिकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिलेल्या योगदानाप्रित्यर्थ कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यासाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्याने सर्व स्वातंत्र्यसैनिक व त्यांचे जोडीदार यांचा मानपत्र, शाल व पुष्पगुच्छ देऊन पालकमंत्री यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिक अथवा त्यांचे जोडीदार हे या सत्कारापासून वंचित राहू नये यासाठी सर्व स्वातंत्र्यसैनिक व जोडीदारांनी हयातीचा दाखला व स्वातंत्र्य संग्राम सैनिकाशी संबंधित इतर कागदपत्रे निवासी उपजिल्हाधिकारी यांचेकडे 25 मे 2023 पर्यंत जमा करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने