Top News

"मी जे बोललो ते भाजपा तालुकाध्यक्षाविरूद्ध बोललो, पक्षाविरुद्ध अपशब्द वापरलेलो नाही" #chandrapur #Korpana #BJYM #BJP


दिनेश सूर यांचा खुलासा

भाजयुमोच्या जिल्हा सचिव पदावरुन केले दिनेश सुर यांना कार्यमुक्त; भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे यांनी दिले कार्यमुक्तीचे पत्र

Google ads.
कोरपना:- कोरपना तालुक्यातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये कसलेच आलबेल नसल्याने अंतर्गत कुरघोड्या सुरू आहेत. यामध्ये कोरपना तालूका अध्यक्ष व भाजयुमोचे जिल्हा सचिव यांचा वाद चांगलाच रंगला आहे. या वादामुळे पक्षाच्या ध्येयधोरणला तडा जाणार असल्याचे लक्षात येताच. सदर प्रकरणाची गंभीर दखल घेत भाजपाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी यात शेवटी हस्तक्षेप करून भाजयुमोच्या जिल्हा सचिवावर कार्यमुक्तीची कार्यवाही केल्याने हळबळ माजली आहे. यावर कार्यमुक्त झालेले दिनेश सुर यांनी आधार न्यूज नेटवर्कला दिलेल्या माहितीनुसार "मी जे बोललो ते भाजपा तालुकाध्यक्षाविरूद्ध बोललो, पक्षाविरुद्ध अपशब्द वापरलेलो नाही. असा खुलासा त्यांनी प्रसार माध्यमातून केला आहे. यात त्यांनी कोरपना भाजपा तालुकाध्यक्ष पक्षाविरुद्ध काम करून सुद्धा त्यांचेवर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही आणि पक्षविरोधी काम करणाऱ्या तालुकाध्यक्षाबद्दल मी बोललो तर मला पक्षाने उत्तर न मागता माझ्यावर कारवाई केली असा सवालही त्यांनी यावेळी केला.

निष्ठांवंत कार्यकर्त्यांवर होत असलेल्या अन्यायामुळेच कोरपना तालूका भाजपामध्ये गटबाजीचे राजकारण सुरू आहे. कार्यकर्ता सुद्धा पक्षाचा एक कणा आहे. कार्यकर्त्यांना पक्षात काहीच अर्थ नाही का..? मग सारे दिवस कार्यकर्त्यांनी सतरंज्याच उचलायच्या का? असा खोचक सवालही त्यांनी यावेळी केला आहे.

काय आहे प्रकरण व का करण्यात आली कार्यवाही?

भाजयुमोचे जिल्हा अध्यक्ष आशिष देवतळे यांनी दिनेश सुर यांचेवर कार्यवाही करत दि. ८ मे २०२३ ला दिलेल्या कार्यमुक्तीच्या पत्रात स्पष्ट नमूद केले आहे की, मागील काही दिवसांपासून आपण अनेक वेळा पक्ष विरोधी वागणुक केल्याचे आढळले. आपल्या या बेजबाबदार कार्यामुळे पक्षाची प्रतिमा खराब होत आहे. अशी आपणास सूचना देऊन सुद्धा आपना कडून वारंवार पक्ष विरोधी कार्य झाल्याचे आढळले. हि बाब पक्ष शिस्तीच्या विरोधातली असुन आपल्या कृत्यामुळे सर्व सामान्य कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश गेला आहे. त्यामुळे आपणास भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा सचिव पदावरून कार्यमुक्त करण्यात येत आहे. यानंतर भारतीय जनता पक्षासोबत आपला कोणताच संबंध राहनार नाही.

यावर दिनेश सुर यांनी झालेली कार्यमुक्तीची कार्यवाही हि दबावाखाली व कसलेही म्हणणे ऐकून न घेता केलेली आहे असे म्हणत खुलासा देत आपली बाजू मांडली आहे.

दिनेश सुर यांनी आधार न्यूज नेटवर्क ला दिलेल्या माहितीनुसार करण्यात आलेला खुलासा

मी (दिनेश सूर) पक्षविरुद्ध पोस्ट किंवा अपशब्द वापरले नाही. आज पर्यंत पक्षाने माझ्यावर जबाबदारी दिली ते पूर्णपणे मी (दिनेश सूर) प्रामाणिकपणे करत होतो‌ तालुका अध्यक्ष तडफदार पाहिजे अशी मागणी किती वर्षापासून सुरू आहे. पण पूर्ण झालेली नाही.

तालुका अध्यक्ष आत्ताच झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजप पक्ष तिसऱ्या क्रमांकावर राहिला. तालुकाध्यक्ष हा गोरगरीब जनतेपर्यंत पोहचून त्यांच्या समस्या सोडवणारा पाहिजे. पण आमचा तालुकाध्यक्ष फक्त 4 रोजदार लाउन बस स्टॉप ला येऊन फोटो काढून पेपरला देण्याचं पुरता मर्यादित आहे. पक्ष कसा वाढेल? मी जे बोललो हे अध्यक्षाविरुद्ध बोललो, पक्षाविषयी मी एकही शब्द वाईट बोललो नाही व भारतीय जनता पक्षाचा विरुद्ध काहीही कार्य केलेले नाही.

पण मागील 2017 मध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये ऐनवेळी निवडणुकीच्या तोंडावर मला तिकीट पाहिजे. असं आग्र धरून असलेल्या अध्यक्षांना तिकीट जिल्हा परिषद ची मिळाली नाही. तिकीट मिळो अथवा न मिळो हा पक्षाचा निर्णय असतो. पण तालुकाध्यक्ष म्हटल्यावर आपण पक्षाचे काम प्रामाणिकपणे करायला पाहिजे. जिल्हा परिषदचे निवडणूक सुरू झाली आणि तालुकाध्यक्षांनी निवडणुकीचा प्रचार न करता पक्षात आलेले आबिद अल्ली यांचं निलंबन करण्यासाठी हट्ट धरून चंद्रपुरात बसले आणि निलंबन करून पत्र व्हाट्सअप केल आणि अवघ्या काही मताने जिल्हा परिषद मध्ये भाजप उमेदवाराचा पराभव झाला.

तसेच 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार यांच्याविरुद्ध प्रचार करण्यात आला. मला सुद्धा सांगण्यात आलं होतं, पक्षविरुद्ध प्रचार करा. पण आम्ही एकनिष्ठ पक्षाचे प्रामाणिकपणे काम केलं तसेच तेव्हाचे तालुका महामंत्री स्व. नथ्थू पाटील ढवस यांनी तर फोन वर पंजा म्हणजे कॉंगेसला मतदान करा असे सांगितले. तेव्हा त्यांनी ऑडिओ रेकॉर्डिंग सुध्दा सोशल मीडिया वर व्हायरल झाली होती‌. त्याबद्दल पक्षाकडे सुध्दा तक्रार करण्यात आली होती, परंतु गटबाजीमुळे त्यांच्यावरही काहीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे काही मताने आपली विधानसभा आपण हरलो.

मग आज मी तालुकाध्यक्ष विरुद्ध बोललो असता माझ्यावर पक्षाने उत्तर न मागता कारवाई केली. पक्षाविरुद्ध तालुकाध्यक्ष काम करतो तेव्हा त्यांच्यावर कोणीही आणि कसल्याही प्रकारची कारवाई होत नाही, असं का बरं. कार्यकर्ता सुद्धा एक पक्षाचा कणा आहे. मग सारे दिवस कार्यकर्त्यांनी सतरंज्या उचलायच्या का? प्रामाणिकपणे काम आज वरी केलं. तालुका अध्यक्ष फोन वर मनतो 3 विकेट पाळली. मी त्याबद्दल पक्षाने आपल्याला निलंबनाचे पत्र दबावाखाली दिल्याबद्दल आपले धन्यवाद असा खुलासा दिनेश सूर यांनी केला आहे.

दिनेश सुर यांच्या प्रसारमाध्यमातून दिलेल्या खुलास्यानंतर पक्षश्रेष्ठी काय भुमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र कोरपना तालूका भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यात समेट घडवून आणणे हे ही भाजपा पक्षश्रेष्ठींना आवाहन राहणार आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने