Top News

काँग्रेसमध्ये ठिणगी, विजय वडेट्टीवार VS नाना पटोले वाद शिगेला #chandrapur #nagpur #Congress


लहान-मोठा नेता कोण? संघर्ष पेटला

Google ads.
नागपूर:- खरंतर या दोन बड्या नेत्यांमधील वाद हा चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत स्थानिक पातळीवर झालेल्या आघाडीमुळे सुरु झाला. नाना पटोले यांनी चंद्रपूर बाजार समितीत स्थानिक पातळीवर भाजपसोबत हातमिळवणी केल्याने प्रकाश देवतळे यांच्याविरोधात कारवाई केली. पण प्रकाश देवतळे यांच्याविरोधात करण्यात आलेल्या कारवाई विरोधात काँग्रेसमधील एक गट आक्रमक झालाय.

प्रकाश देवतळे हे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या विश्वासातील नेते आहेत. त्यामुळे नाना पटोले यांनी केलेल्या कारवाईनंतर वडेट्टीवार यांच्या नागपुरातील घरी चंद्रपूरच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत नाना पटोले यांनी केलेल्या कारवाई विरोधात चर्चा झाली. संबंधित प्रकरणी दिल्ली हायकमांडला तक्रार करण्याची चर्चा झाली. या सर्व प्रकारानंतर विजय वडेट्टीवार यांनी नाना पटोले यांना नाव न घेता जीभेवर संयम ठेवण्याचा सल्ला दिला. त्यानंतर वाद पुढे वाढत गेला.

नाना पटोले यांची तिखट प्रतिक्रिया

“आमच्या सगळ्या नेत्यांनी आपल्या जीभेवर संयम ठेवावा. आघाडी मजबूत होईल, असे प्रयत्न करावेत. तोडण्याची भाषा कुणीही करु नये. उलट जोडण्याची भाषा करावी. शब्दाला आणि लिहिण्याला मर्यादा असाव्यात”, असं विजय वडेट्टीवार म्हणाले. त्यावर नाना पटोले यांनी पत्रकारानी प्रश्न विचारला तेव्हा “त्याचं आम्ही एका बंद खोलीत निर्णय घेऊ. वडेट्टीवार इतका मोठा नाही की त्याच्यासाठी मी इथे उत्तर दिलं पाहिजे”, अशी तिखट प्रतिक्रिया त्यांनी दिली.

विजय वडेट्टीवार यांची सविस्तर प्रतिक्रिया

नाना पटोले यांच्या तिखट प्रतिक्रियेला विजय वडेट्टीवार यांनी प्रत्युत्तर दिलं. प्रदेशाध्यक्षांनी माहिती घेऊन संयमानं वक्तव्य करायला हवं होतं, अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिली. पटोले यांच्या नजरेत मी लहान असेल. पण जनतेच्या नजरेत मी मोठा आहे, असंही वडेट्टीवार म्हणाले. मला वाटतं त्यांचा काही गैरसमज झालेला असावा. आघाडी टिकवायची असेल तर सर्वांनी संयमाने बोलावं एवढीच माझी भूमिका होती. ती काही कोणा नेत्या संदर्भात नव्हती. त्यांनी माहिती घेऊन बोलणं अपेक्षित होतं. मला वाटतं ते कदाचित चुकले असावेत”, असं विजय वडेट्टीवार म्हणाले. राहिला विषय कोण मोठा, कोण छोटा, त्यांच्या नजरेत मी छोटा असेल. कारण ते मोठे नेते आहेत. मी पाचवेळा आमदार म्हणून निवडून आलेलो आहे. त्यांच्या नजरेत मी लहान असेल, पण जनतेच्या नजरेत मी मोठाच नेते आहे. जनतेनेच मला मोठं केलं आहे. कुणी मला छोटा म्हणत असेल तर तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे”, असं देखील वडेट्टीवार म्हणाले.

नाना पटोले म्हणाले, ‘बंद खोलीमध्ये निर्णय घेऊ’, वडेट्टीवार म्हणतात…

“निर्णय कोण कोणाचा करायचा हे कोणी ठरवतात ते वेळ आल्यावर आम्ही उत्तर देऊ. माझा निर्णय करण्यासंदर्भात इतका मोठा कोणी नाही”, अशा शब्दांत विजय वडेट्टीवार यांनी नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिलं.

नाना पटोले यांना सुनावलं

“गैरसमजातून दरी वाढेल अशाप्रकारचं कृत्य जबाबदार नेत्यांनी करु नये, अशी माझी अपेक्षा आहे. वाद वाढवण्यापेक्षा संपवता कसा येईल, ही भूमिका नेत्याकडून अपेक्षित असते. मला ज्या भाषेत नाना बोलले त्या भाषेत मलाही बोलता येतं. पण मी तसं बोलणार नाही. मी आमदार असताना ते दूध संघाचे संचालक होते. त्यांच्यापेक्षा मी विधीमंडळात सीनियर आहे”, अशा शब्दांत विजय वडेट्टीवार यांनी नाना पटोले यांना सुनावलं. त्यांना वाटत असेल तर बाबा मी लहानच आहे. कारण ज्याच्या अंगी मोठेपण त्याला यातना कठीण आहेत. आम्ही लहान आहोत, आम्हाला यातना लहान आहेत. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत”, असं शेवटी विजय वडेट्टीवार म्हणाले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने