मुल:- मूल रेल्वे स्टेशनच्या गेटवर मोठी मशिन घेऊन जाणारा ट्रक अडकल्याने शनिवारी मूल- चंद्रपूर मार्ग पाच तास ठप्प होता. सात ते आठ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. बस व खासगी ट्रॅव्हल्समधील प्रवाशांना उन्हाच्या तडाख्यात ताटकळत राहावे लागते. उ्ड्डाणपूल नसल्याने दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीने सर्वच हैराण झाले आहेत.
मूल रेल्वे स्थानकाजवळ उड्डाणपूल नसल्याने एक गेट लावण्यात आला. या गेटमधून जडवाहने जाण्यास अडचणी येतात. शनिवारी मोठी मशिन घेऊन जाणारा ट्रक गेटमध्ये अडकल्याने मूल तहसील कार्यालयापासून ते जानाळापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. गडचिरोली, ब्रह्मपूरीवरून चंद्रपूरकडे जाणाऱ्या बस, ट्रॅव्हल्स वाहनातील प्रवाशांना ताटकळत राहावे लागले.