जिल्ह्यातील सात स्काऊट गाईड शिक्षकांचे पुणे येथे यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण #chandrapur #ScoutGuide


https://www.adharnewsnetwork.com

Google ads.

चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील सात स्काऊट गाईड शिक्षकानी नुकतेच महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट गाईड राज्य प्रशिक्षण केंद्र रामबाग भोर जिल्हा पुणे येथे आठ दिवस निवासी शिबिराला उपस्थित राहून आपले प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले.
ऑक्टोबर 2022 मध्ये प्राथमिक प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थी पैकी जिल्ह्यातून सहा शिक्षकांची प्रगत प्रशिक्षनासाठी निवड करण्यात आली तर एका शिक्षकाची प्राथमिक प्रशिक्षण साठी निवड करण्यात आली.

यामध्ये स्काऊट मास्टर प्राथमिक प्रशिक्षणास शिवाजी हायस्कूल माथा ता. कोरपना येथील सुधाकर पेंदोर, स्काऊट मास्टर प्रगत प्रशिक्षणास कर्मवीर विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय नागभीड ता.नागभीड येथील स्काऊट मास्तर श्री.किशोर नीलकंठ नरुले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यालय, मुरसा ता.भद्रावती येथील श्री.एस.एच. मानकर, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पल्लेझरी ता. जिवती येथील उमाजी यादवराव कोडापे, प्रशांत विद्यालय किटाडी तालुका नागभीड येथील प्रशांत जनार्धन गावंडे, भवानजीभाई हायस्कूल चंद्रपूर येथील महेश नथुजी बावणे,संकेत जयकर सहभागी झाले होते.

सहभागी स्काऊट शिक्षकांनी हे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले. प्रशिक्षण स्थळी घेतलेले अनुभव व केलेली कृती याचा फायदा जिल्ह्यातील विविध विद्यालयातील स्काउटर विद्यार्थ्यांना होणार आहे. जिल्ह्यातील स्काउट चळवळीला वेग यावा,स्काऊटर विद्यार्थ्यांना विविध उपक्रमामध्ये व स्पर्धेमध्ये सहभागी होता यावे यासाठी सदर प्रशिक्षण अतिशय महत्वाचे मानले जाते म्हणुनच जिल्हा संघटक श्री.चंद्रकांत भगत यांनी वारंवार शिक्षकांना प्रोत्साहीत केले.

रामबाग भोर (पुणे) येथील प्रशिक्षण शिबीर प्रमुख श्री रविंद्र बचाव सर मार्गदर्शक स्काऊट मास्तर श्री विकास लोखंडे सर ,श्री दिलीप नेवसे सर ,श्री जॉन स्वामी सर ,श्री सुरेंद्र शिंदे सर यांनी उत्कृष्ट मार्गदर्शन करून स्काऊट गाईड चळवळीचा इतिहास,शाळेत युनिट सुरू करणे,विविध गॅझेट तयार करणे,गाठी बांधणे,शालेय शिस्त,जांबोरी इत्यादी सराव करवून घेतले. जिल्हा मुख्य आयुक्त तथा शिक्षणाधिकारी (प्राथ. ) श्री दीपेंद्र लोखंडे साहेब, जिल्हा आयुक्त गाईड तथा शिक्षणाधिकारी (माध्य.)श्रीमती कल्पना चव्हाण जिल्हा स्काऊट गाईड प्रमुख मा.चंद्रकांत भगत, दिपा मडावी जिल्हा प्रशिक्षक किशोर उईके यांनी अभिनंदन केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने