पवारांची निवृत्ती, मनधरणीचा प्रयत्न #chandrapur #Mumbai

Bhairav Diwase
0


मुंबई:- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांनी नुकतीच राष्ट्रवादी पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली आहे. मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटरमध्ये 'लोक माझा सांगती' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात पवारांनी घोषणा केली. कार्यकर्त्यांना धक्काच बसला. आमदार, नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून शरद पवार यांची मनधरणीचा प्रयत्न सुरू आहे.

यावेळी शरद पवार म्हणाले की, मला विद्यार्थी चळवळीत आधिक रस होता. नववीत असताना पहिला मोर्चा काढला. १९६७ पर्यंत मला आमदार म्हणून संधी मिळाली. त्यानंतर सतत मी विविध पदांवर आहे. म्हणजेच गेली ५६ वर्षे मी राजकारणात विविध पदावर आहे. आता आपण राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदारुन निवृत्ती घेत आहोत.

माझे घर काँग्रेसच्या नव्हे तर शेतकरी कामगार पक्षाच्या विचारांचे होते. माझे वडील बंधू शेतकरी कामगार पक्षाचे नेते होते. परंतु त्या काळात महाराष्ट्र निर्मितीच्या चळवळीमुळे आम्ही काँग्रेसच्या जवळ जाऊ लागलो. मी यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांकडे आकर्षित झालो. त्यावेळी घरातील वातावरण वेगळे व माझे विचार वेगळे असे झाले, असे पवार यांनी यावेळी म्हंटले. यावेळी शरद पवार यांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार सुद्धा भावूक झाल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)