नागपूर:- खापरखेडा औष्णिक वीज केंद्रातील क्रेशर हाऊस परिसरातील स्क्रॅप मटेरियल खाली फेकताना ३० मीटर उंचीवरून तोल जावून खाली पडल्याने एका कंत्राटी कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली. शेकडो कामगार घटनास्थळी पोहचल्याने तणावाचे वातावरण होते. मधुकर विठ्ठल लांडे (वय ४१ रा.रोहना) असे या मृतक कंत्राटी कामगारांचे नाव आहे.
याबाबतची अधिकची माहिती अशी की, मधुकर हा ओरियन इंडस्ट्रीज कंपनी अंतर्गत कोळसा हाताळणी विभागात कार्यरत होता. दुपारी २.३० च्या सुमारास क्रेशर हाऊस परिसरात तो ३० मिटर उंचीवर कार्यरत होता यावेळी स्क्रॅप मटेरियल रोप वे ने खाली फेकत असतांना मृतक कंत्राटी कामगार मधुकरचा अचानक तोल जाऊन खाली पडला सदर घटनेची बातमी परिसरात वाऱ्या सारखी पसरली यावेळी शेकडो कामगारानी घटनास्थळावर गर्दी केली.
वीज केंद्राचे रुग्ण वाहिकेने नागपुरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र मधुकरचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मात्र मधुकरचा मृत्यू घटनास्थळावरच झाल्याची चर्चा कामगार वर्तुळात आहे. मधुकर हा सर्वसामान्य कुटुंबातील असून त्याला पत्नी व दोन मुले असल्याची माहिती मिळाली.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत