Top News

वाढदिवसाच्या सेलिब्रेशनऐवजी तरुणीवर काळाचा घाला #chandrapur #Amravati #Accident #Nagpurhttps://www.adharnewsnetwork.com

Google ads.

अमरावती:- वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी चिखलदरा गाठण्यापूर्वी अपघातात तरुणीला जीव गमवावा लागला. परसापूर येथील ठोकब फाट्यावर २५ मे रोजी दुपारी अपघात घडला. सायंकाळी तरुणीचा मृत्यू झाला.

वैष्णवी अर्जुन मस्करे (१७) असे अपघातातील मृत तरुणीचे नाव आहे. नात्यातील प्रेरणा संतोष लिल्हरे (१४) हिचा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी या दोघींसह अल्केश चक्रधर राऊत (१९, तिघेही रा. तेलंखडी, पथ्रोट) व राजवीर वर्मा (१२, रा. नागपूर) हे एका दुचाकीने, तर दुसऱ्या दुचाकीने पीयूष संतोष लिल्हरे (१७), वैष्णवी अर्जुन मस्करे (१७, दोघे रा. तेलंखडी) व हिना वर्मा (वय १४) रा. नागपूर असे एकूण सहा अल्पवयीन प्रेरणा चिखलदरा येथे गले होते.

परसापूरसमोर ठोकबर्डा फाट्यानजीक विरुद्ध दिशेने येणाऱ्या एम एच ०२ एव्ही ९८१ क्रमांकाच्या कारची पीयूष लिल्हरेच्या दुचाकीशी धडक झाली. त्यावेळी मागे बसलेली वैष्णवी कारच्या विरुद्ध दिशेने फेकल्या गेल्याने कारचे मागील चाक तिच्या डोक्यावरून गेले. यात तिला गंभीर दुखापत झाली. घटनास्थळावरून तिला परतवाडा येथील खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. पुढील उपचारासाठी अमरावती येथे पाठविले असताना रस्त्यातच तिचा जीव गेल्याची दुर्दैवी घटना घडली. घटनेची माहिती कळताच पथ्रोट पोलिसांनी अपघातातील कार व दुचाकी जप्त करून प्रथमदर्शनी गुन्हा नोंदविला. घटनेचा अधिक तपास पथ्रोट पोलिसांनी सुरू केला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने