चंद्रपूर:- अल्का आत्राम चंद्रपूर जिल्हा ग्रामीण भारतीय जनता महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षची जबाबदारी सांभाळत असताना आता अल्का आत्राम यांची भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या प्रदेश महामंञीपदी नियुक्ती करण्यात आली.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी हि कार्यकारीणी घोषित केली.
अल्का अत्राम-चंद्रपूर, मंजुषा कुद्रीमोती-रायगड, छाया देवांग-नाशिक, स्वाती शिंदे-सांगली, मिना मिसाळ-छ. संभाजीनगर, रेखा हाके-लातूर, रश्मी जाधव-मुंबई, रचना गहाणे-भंडारा या सर्वची भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या प्रदेश महामंत्रीपदी नियुक्ती करण्यात आले आहे.
आपण सर्व जणी संघटनेच्या कामात आजवर उत्साहाने योगदान देत आला आहात यापुढेही संघटनेच्या वाढीसाठी आपले योगदान मिळेल असा विश्वास आहे. उर्वरीत नियुक्त्याही लवकरच करण्यात येतील. अशी माहिती भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी ट्विट करून दिली.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत